Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्यासाठी 2 मार्चपर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा। 


 मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजनेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस 2 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिवांनी दिली आहे.       

  मराठी भाषेतील उत्कृष्ठ वाड:मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत पाठविता येणार होत्या. तथापि, पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याचा कालावधीस 2 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दिनांक 1 जानेवारी  ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या वेबसाईटवर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात Late Yashwantrao Chavan State Literature Award 2022 Rules Book and Application Form या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्याhttps://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका  व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक कागदपत्रांसह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 2 मार्च 2023 पर्यंत पाठवावेत. लेखक, प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक, प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक, प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेशिका व पुस्तकांच्या दोन प्रती दिनांक 2 मार्च 2023  पर्यंत पाठवाव्यात.

 लेखक, प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर, पाकीटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख  करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 2 मार्च 2023 राहिल. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...