इचलकरंजी/गीता संघर्ष वृत्तसेवा। 
डीकेटीईमध्ये व्हीडीओ समराईझेशन युसिंग डीप लर्निंग या प्रकल्पासोबत विद्यार्थी व मार्गदर्शक.
डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी मधील कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागात शिकणा-या अंतिम वर्षातील प्रसन्ना काळे, प्रसाद कुलकर्णी, प्रदिप लेंगरे व प्रसाद लोटके यांनी प्रा.संदिप सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘व्हीडीओ समराईझेशन युसिंग डीप लर्निंग‘ हा अभिनव प्रकल्प विकसित केला.
डीकेटीई मधील विद्यार्थी दरवर्षी समाजासाठी उपयुक्त असे अभिनव व नाविण्यपूर्ण असे प्रकल्प/प्रोजेक्ट विकसित करत असतात. संस्थेच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी आपला अंतिम वर्षातील प्रोजेक्ट निवडताना प्राधान्याने लोकांच्या दैनंदीन जीवनात येणा-या अडचणी समजावून घेवून त्यावर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाधानकारक उपाय योजना तयार करण्याचा प्रयत्न केला जातो.
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी ‘व्हीडीओ समराईझेशन युसिंग डीप लर्निंग‘ हा प्रकल्प विकसित केला असून यामध्ये विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही सर्व्हेलिंएन्स शी निगडीत समाज उपयोगी प्रोजेक्ट विकसित केला आहे. आज आपण बघतो की जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही सर्व्हेलिंएन्स व्यस्थेचा वापर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून केला जातो. या सीसीटीव्ही सर्व्हेलिंएन्स सिस्टीममध्ये व्हीडीओ रेकॉर्डिंग केले जात असताना त्याची साईज ही खूप जास्त होते व ही माहीती हाताळणे तसेच व्यवस्थापन करणे हे काम थोडे अवघड होवून जाते.
यावर उपाययोजना म्हणून व्हीडीओ समराईझेशन युसिंग डीप लर्निंग च्या सहायाने विद्यार्थ्यांनी विकसित केलेला प्रोजेक्ट डाटा स्टोअरेज साठी समाधानकारक उपाय योजना प्रदान करते. या प्रोजेक्ट मध्ये विद्यार्थ्यांनी डीप लर्निंग तंत्रज्ञान वापरुन ए.आय. आधारीत संगणक प्रणाली विकसित केली आहे. ज्यामध्ये व्हीडीओ रेकॉर्डिंग होत असताना सीसीटीव्ही च्या फुटेज मधील ऑब्जेक्ट च्या हालचाली वरील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने फिल्टर करुन फक्त हालचाली असलेला व्हीडीओ डाटा स्टोअर केला जातो. ज्यामुळे अनावश्यक स्टोअरेज रिक्वाएरमेंट ची गरज भासणार नाही यामुळे एखाद्या घटनेमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची प्रक्रिया सुलभ व वेगाने होईल व तपासयंत्रणांचा वेळ वाचेल.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी प्रकल्प तयार केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांस संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे,विभा गप्रमुख डॉ डी.व्ही.कोदवडे व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.


0 Comments