Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

राज्यव्यापी लिंगायत महामोर्चाला जाहीर पाठिंबा समीर पटेल

जयसिंगपूर /गीता संघर्ष वृत्तसेवा

  राज्यव्यापी लिंगायत महामोर्चा   आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या राज्यव्यापी मोर्चाला  सामाजिक कार्यकर्ते समीर भाई पटेल यांनी पत्रकार परिषदेत जाहीर पाठिंबा दिला व मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सामील होण्यासाठी  आव्हान  केले लिंगायत समाज मागील अनेक वर्षापासून सर्वसामान्य जनतेमधून लिंगायत धर्माचा संविधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे कर्नाटक मध्ये विधिमंडळात  यशही मिळाले आहे परंतु महाराष्ट्रात नांदेड लातूर कोल्हापूर सांगली यवतमाळ परभणी संभाजीनगर सोलापूर नाशिक पुणे इतर लाखोंच्या संख्येने मोर्चा निघाले यामध्ये राज्यतील लिंगायत समाज संघटित झाला परंतु सरकारने अजूनही मागण्याविषयी गंभीर्य विचार केला नाही आज अल्पसंख्याक दर्जा व आर्थिक विकास महामंडळ लिंगायतच्या मिळणे हा लिंगायत चा हक्क आहे यातून समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न व तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटेल व लिंगायत यांचे सर्वांगीण विकासासाठी मदत होईल लोकशाहीमध्ये जो समाज संघटित होऊन संघर्ष करतो त्या समाजाचे भविते चांगले राहते त्यामुळे या सर्व मागण्या घेऊन रविवारी दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी पहिल्यांदाच लिंगायत चा महामोर्चा मुंबई येथे होणार आहे तरी राज्यातील लिंगायत बांधवांनी लाखोंच्या संख्येने सामील होणारच आहेत तरी सर्व अल्पसंख्याक बांधवांनी पाठिंबा देऊन व मोर्चामध्ये सामील होऊन या महामोर्चाला यशस्वी करावे असे आव्हान समीर भाई पटेल यांनी पत्रकार परिषदेत केले

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...