राज्याच्या वाट्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर रणंकदन सुरु झाले आहे. तीन महिन्यात तीन प्रकल्प गेल्याने महाविकास आघाडीमधील नेत्यांनी चौफेर टीका केली आहे. माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. गुजरात एक वेगळा देश निर्माण होणार आहे का? अशी शंका येत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे. राज्याला मागं ढकलण्याचा प्राधान्यक्रम या सरकारचा असल्याचा घणाघात त्यांनी केला. मुंबईचे महत्त्व कमी करणे हा एकच अजेंडा भाजपचा असल्याचा आरोप त्यांनी केला.
नागपूरमधील प्रस्तावित टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सतेज पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे राजकीय वजन कमी पडतं हे आता लोकांना कळलं आहे. देशाचं सरकार एका राज्यासाठी चाललय का असा प्रश्न निर्माण होत आहे. डायमंड इंडस्ट्री, बुलियन ट्रेडिंग असे अशा महत्त्वाच्या केंद्र गुजरातला गेली, त्यामुळे गुजरात एक वेगळा देश निर्माण होणार आहे का अशी शंका आहे.
देशाची सगळी संपत्ती एका राज्यात घेऊन जाण राज्यावर अन्यायकारक आहे, एअरलाईन्सचे प्रमुख ऑफिस मुंबईहून नोएडाला गेले, मुंबईचे महत्त्व कमी करणे हा एकच अजेंडा भाजपचा असल्याचे ते म्हणाले.



0 Comments