मुंबई / गीता संघर्ष वृत्तसेवा :
'50 खोके एकदम ओके' एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या या घोषणेची सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. बैलपोळा, दिवाळी, होळीसारख्या सणावारात या वाक्याचा लोक सर्रास वापर करू लागलेत.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिंदे गटातील आमदारांनी 50 कोटी रूपये घेऊन बंड केलं असा आरोप सातत्याने करत आहेत. यामुळे शिंदे गटातील आमदार बेचैन झालेत.
अपक्ष आमदार बच्चू कडूंनी "हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हा डाग कामयचा मिटला पाहिजे. गावोगाव लोक 50 खोके बोलतायत," असं म्हणत शिंदे-फडणवीसांवर नाराजी व्यक्त केलीये.



0 Comments