कुंडा / वृत्तसंस्था।
सुरक्षा प्रभारी सुमन आनंद यांच्या तक्रारीवरून 1 सप्टेंबर रोजी कुंडा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी सांगितलं की, ‘या व्यक्तींनी एटीसी कार्यालयात घुसून सर्व ‘सुरक्षा नियमांचं’ उल्लंघन केलं आणि उड्डाणाच्या परवानगीसाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला.’
कुंडा पोलिस स्टेशनचे प्रभारी प्रवीण कुमार यांनी सांगितलं की, ‘तक्रारीनंतर दोन्ही खासदार निशिकांत दुबे, मनोज तिवारी आणि विमानतळ संचालकांसह नऊ जणांवर आयपीसी कलम 336 (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारं कृत्य), 447-448 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.’
खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी नव्या वादात सापडले आहेत. हे प्रकरण झारखंडमधील विमानतळाच्या सुरक्षा भंगाशी संबंधित आहे. पेट्रोल हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अंकिताच्या नातेवाईकांना
खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी नव्या वादात सापडले आहेत. हे प्रकरण झारखंडमधील विमानतळाच्या सुरक्षा भंगाशी संबंधित आहे. पेट्रोल हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अंकिताच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी खासदार निशिकांत दुबे, मनोज तिवारी आणि कपिल मिश्रा यांच्यासह अनेक लोक दुमका इथं पोहोचले होते. यादरम्यान खासदार चार्टर्ड विमानातून देवघर विमानतळावर उतरले होते. यावेळी खासदारासोबत त्यांची दोन्ही मुलंही सहभागी झाली होती.
दुमका येथून आल्यानंतर खासदार पुन्हा गावी जाण्यासाठी साडेपाच वाजता विमानतळावर पोहोचले आणि चार्टर विमानात बसले. यावेळी देवघर विमानतळ एटीसीनं विमानाला परवानगी दिली नाही.
यानंतर खासदार दुबे, त्यांची दोन मुलं, मनोज तिवारी, सुनील तिवारी यांच्यासह हे सर्व लोक बळजबरीनं एटीसी इमारतीत घुसले आणि अधिकार्यांकडून बळजबरीनं मंजुरी घेऊन दिल्लीला रवाना झाल्याचा आरोप आहे.









0 Comments