कोल्हापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज (ता. ९) होत असला तरी अद्याप शपथविधीसाठी येण्याचा निरोप भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांना मिळालेला नाही. त्यामुळे विस्तारात कोल्हापूरची पाटी कोरीच राहण्याची शक्यता आहे.
मंत्रिपदासाठी जिल्ह्यातील आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आबिटकर, डॉ. विनय कोरे व प्रकाश आवाडे प्रमुख दावेदार आहेत. उद्याच्या विस्तारात फक्त कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याने कोल्हापुरातील यापैकी कोणाची वर्णी लागेल का नाही, याविषयी संभ्रम आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे सुपुत्र व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश निश्चित असल्याचे समजते. श्री. पाटील मंत्री झाल्यास जिल्ह्यातून अन्य कोणाला संधी मिळेपर्यंत त्यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात येईल, अशी चिन्हे आहेत.








0 Comments