कोल्हापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा।
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील एका कारकुनाने पैशासाठी वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ केल्याने संबंधित ठेकेदाराने दहा हजारांची चिल्लर कारकुनाच्या टेबलवर ठेवण्याचा प्रकार कावळा नाका येथील जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात
घडला. या प्रकारामुळे 'मजिप्रा'तील खाबुगिरी चव्हाट्यावर आली आहे.
केमिकल पुरवठ्यासाठी जीवन प्राधिकरणने निविदा मागविल्या होत्या. सर्वात कमी रकमेची निविदा मंजूर करण्यात आली.
निविदा मंजूर झाल्यानंतर संबंधित ठेकेदार कारकुनाकडे वर्क ऑर्डर मागण्यासाठी गेला. यावेळी त्याला आमच्याकडे थोडे बघा असे सांकेतिक भाषेत सांगितले गेले. या ठेकेदाराने आपल्या परीने त्याला खुश करण्याचा प्रयत्न केला,
तरीदेखील कारकून खूश झाला नाही. आपण नव्याने काम घेतले आहे. त्यामुळे काम झाल्यानंतर बघू, अशी विनंती ठेकेदाराने केली. परंतु, कारकुनाने आपला हट्ट कायम ठेवला. या कारकुनाबद्दल कार्यालयात प्रचंड तक्रारी आहेत.
परंतु, त्याचा वशिला मोठा असल्यामुळे तो अधिकाऱ्यांनाही दाद देत नसल्याचे बोलले जाते. 2019 मध्ये संबंधित कारकुनाची पदोन्नती झाल्यामुळे त्याने सध्याच्या जागेवर येण्याचा प्रयत्न केला होता.
अधिकारी तेथून गेल्यानंतर मात्र या कारकुनाने सध्याच्या जागेवर आपली वर्णी लावून घेतली.










0 Comments