शिरोळ / गीता संघर्ष वृत्तसेवा।
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे कॅबिनेटमध्ये ठराव करून द्यावा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ 
साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठीची शिफारस पंतप्रधान व राष्ट्रपती यांचेकडे करावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिरोळ तालुका मातंग समाजामार्फत देण्यात आले.
ठाणे येथे प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटून शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. अवघ्या दीड दिवसाच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन सातासमुद्रापार भारत देशाचे नाव साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांनी उंचावले. तसेच संपूर्ण देशभरात चळवळीच्या माध्यमातून कष्टकरी शेतकरी दलित, गिरणी कामगार यांना ऊर्जा देण्यासाठी त्यांनी त्यांच्या झुंजार लेखणीतून दलित चळवळीचा रथ पुढे चालविला. अशा महामानवाला मारणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी विनंती करण्यात आली.
या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे अध्यक्ष खंडू भोरे, सचिव शशिकांत घाटगे, सहसचिव संदीप बिरणगे, युवा अध्यक्ष अॅड. ममतेश आवळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग होता.









0 Comments