Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

खासदार मंडलिकांच्या घरावर शिवसेनेचा मोर्चा

 कोल्हापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा। 


 शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात सामील झालेले कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर

आज शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. खासदार मंडलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी केली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत संजय मंडलिक यांनी भाजप उमेदवार धनंजय


महाडिक यांचा पराभव केला होता. यावेळी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी मंडलिक यांना मदत केली


होती. त्यांच्या जोरावर त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर रस्त्यावर उतरून गेले ते बेंटेक्स आणि राहिले ते सोने असे वक्तव्य  करणारे संजय मंडलिक नंतर शिंदे गटात सामील झाले.

त्यांच्या बंडखोरीविरोधात आज शिवसेनेच्या वतीने त्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. खासदारकीचा राजीनामा द्या, अशी मागणीही त्यांनी केली.


मोर्चात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...