Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

दोन दिवसात पाऊस घेणार विश्रांती

 पुणे / गीता संघर्ष वृत्तसेवा 


 राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले, धबधबे दुथडी बनून वाहत आहेत. त्यामुळे अनेक अपघातं घडल्याचं समोर आलं आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गड, किल्ले, धबधबे अशा धोकादायक ठिकाणी पर्यटनास 17 जुलैपर्यंत बंदी आणली आहे.

या परिसरात 17 जुलैपर्यंत कलम 144 लागू असेल. तसेच पुणे जिल्ह्यातील पाच तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमधील शाळांना 14 ते 16 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता या महाप्रचंड पावसाबद्दल
 हवामान खात्याकडून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

अजून दोन दिवस महाराष्ट्रात मान्सून बरसणार आहे मात्र त्यानंतर संपूर्ण राज्यभरात पावसाचा जोर कमी कमी होणार असल्याची माहिती


पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. अमुपम कश्यपी यांनी दिली आहे. सध्या पुणे आणि घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे.

त्यामुळे अनेकांचं नुकसान झालं आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मात्र आता दोन दिवसांनंतर पाऊस उसंत घेणार असल्याची माहिती नक्कीच दिलासादायक आहे.


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...