अकिवाट/गीता संघर्ष वृत्तसेवा।
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिंदे गटाकडे गेल्यानंतर लोकप्रतिनिधी गेले तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच राहतील यासाठी आपला शिवसेनेशी असलेला एकनिष्ठ पणा दाखवण्याठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना रक्ताने पत्र लिहलं आहे.
पत्रावरील मजकुर असा की,शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे..
युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांसी जय महाराष्ट्र ..
मी निलेश कुमार तवंदकर ,भगव्याचा पाईक, हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून उध्दवजी व आदित्यजी यांच्यासोबत राहुन शिवसेनेशी एकनिष्ठ राहीन व गल्ली तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक यांस प्रयत्नशील राहीन, असे लिहले आहे.
निलेश तवंदकर हे पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात,आंदोलनात,मोर्चात सक्रिय असतात.तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकातुन त्यांचे कौतुक होत आहे.










0 Comments