कोल्हापूर रेड अलर्ट वरून ऑरेंज अलर्ट वर आला असला तरी पावसाचा जोर मात्र कायम
कोल्हापूर/ गीता संघर्ष वृत्तसेवा
मागच्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. घाटमाथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात झालेल्या पावसाने ओढे, नाले, तुडूंब भरून वाहत आहेत. दरम्यान कालपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट देण्यात आला होता.
आज हवामान खात्याकडून कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असला तरी पावसाचा जोर मात्र कायम राहिला आहे. पंचगंगा पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत असली तरी 36.11 इंच इतकी पातळी झाली आहे.
पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असल्याने अवघ्या दोन फुटांवर इशारा पातळी राहिली आहे. तर 43 फूट धोका पातळी असल्याने पुढच्या 24 तासांता पावसाचा जोर असाच राहिला तर महापूर येण्याची शक्यता आहे.
आज (दि.14) पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.








0 Comments