कडू म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी शहरीकरणाचा मुद्दा धरतात, पण शेतकऱ्यांना पांदण रस्तेही नाहीत. त्यामुळे पांडुरंगा, मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जाऊन कर्जमाफीची तारीख जाहीर कर."
सरकारवर हल्लाबोल करताना बच्चू कडू म्हणाले की, "सरकार शेतकऱ्यांसाठी कुठेही मर्दानगी दाखवत नसून हे नामर्दांचे सरकार आहे." राम मंदिरातील पुण्यावरून त्यांनी सरकारला फटकारले, "भाजपला राम मंदिरात जे पुण्य भेटले, ते त्यांची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांच्या १२०० आत्महत्येचे पाप कुठे फेडणार? त्यांच्या धोरणामुळेच शेतकरी मरत आहेत."
जोपर्यंत कर्जमाफीची तारीख निश्चित होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बच्चू कडूंनी स्पष्ट केले. या मागणीसाठी येत्या २ ऑक्टोबरला मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून, त्यांना कर्ज भरण्यासाठी सक्षम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.



0 Comments