राष्ट्रीय/गीता संघर्ष ऑनलाइन डेस्क।
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊल उचले आहेत. त्याच दरम्यान आता पाकिस्तानने गुरुवारी भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध निलंबित केले आहेत. भारत आजवर एका करारामुळे शांत बसला होता. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानच्या तावडीतून सोडविण्याच्या आड १९७२ मध्ये झालेला शिमला करार आड येत होता. त्यात एलओसी ला स्थायी सीमा करण्यात आले होते. आता पाकिस्तानने करार स्थगित करण्याचा निर्णय मागचा पुढचा विचार न करताच घेतला आहे, यामुळे भारताला जे हवे होते, तेच त्यांनी केले आहे. पाकिस्तानने शिमला करार निलंबित केल्याचा अर्थ असा की आता कोणताही देश एलओसी मानण्यासाठी बाध्य नाही. म्हणजेच भारत आता एलओसी पार करून कोणतीही कारवाई करू शकतो. पाकिस्तानने तर यापूर्वीच केली होती, यामुळे त्यांनी या नियंत्रण रेषेची कोणतीच बुज राखली नव्हती. यामुळे पुन्हा त्यांनी ओलांडली तरी त्याचे फारसे महत्व राहणार नाही.



0 Comments