रायबाग/गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क :
घरासमोर उभ्या असलेल्या एका दुचाकीला आग लावून पळून गेल्याची घटना समोर आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कुडची शहरातील अल्पवयीन मुलांनी केलेल्या या कामामुळे कुडची शहर हादरले आहे. प्रभाग क्रमांक-02, मराठा गल्ली येथे शनिवारी रात्री चार अल्पवयीन मुलांनी दुचाकी पेटवून गैरप्रकार केला.
कुडची शहरातील प्रवीण कुलकर्णी यांच्या दुचाकीला लहान मुलांच्या टोळक्याने आग लावली आणि त्याची तोडफोड केली. या प्रकरणी कुडची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



0 Comments