बिरदेव ऐवजी वीरदेव असे रेकॉर्ड करून 75 वर्षांपूर्वीच बिरदेव समाजाची जमीन पश्चिम महाराष्ट्र व देवस्थान समितीने तमदलगे (ता. शिरोळ) बिरदेव समाजास देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबतचे पत्र सुपूर्त केले असून ही जमीन बिरदेव समाजास मिळावी याकरिता शिवसेना युवासेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे यांनी हा पाठपुरावा केला आहे.
75 वर्षांपूर्वी बिरदेव समाजाची जमीन देवस्थान समितीच्या अटी,शर्तीचा भंग करून सदरील जमिनीवर बेकायदा घर बांधकाम व शेततळे तयार केले होते. याबाबतचा वाद काही वर्षापासून जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुरू होता. त्याचा निकाल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला. याबाबत माहिती देताना राकेश खोंद्रे म्हणाले, मौजे तमदलगे येथील गट क्रमांक 256 ही जमीन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मालकीची होती.येथील बिरदेव, पार्वती परमेश्वर व खिंडीतील म्हसोबा या तीन देवस्थानची पूजा करणाऱ्या मंडळींना कसण्यासाठी व दिवाबत्ती पूजाअर्चा इत्यादी कामासाठी देण्याची तरतूद असताना मात्र सदर जमीन मिळवण्यासाठी धनगर समाजाच्या बिरदेव केवस्थान ऐवजी वीरदेव असे नाम साधर्म्य असलेले खोटे रेकॉर्ड करण्यात आले होते. मौजे तमदलगे मधील जमिनीवर श्री कावडे यांनी घर, गोठा, शेततळे व बोरवेल अशी बेकायदा अतिक्रमण केलेले होते. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी सदर वादग्रस्त जमीन समस्त धनगर समाजाच्या ताब्यात दिली आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेल्या निकालानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधिकारी उपअभियंता श्रेयस पाटील, उत्तम मेतके यांनी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती यांच्या ताब्यात दिली. यावेळी उप समितीचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, उपाध्यक्ष सचिन कांबळे, सचिव अशोक पुजारी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुधाकर खोंद्रे पोलीस पाटील अमोल कोळी सरपंच उपसरपंच तसेच धनगर व दलित समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.



0 Comments