राष्ट्रीय / गीता संघर्ष ऑनलाइन डेस्क :
गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वे अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आज ओडिसामध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना जवळपास टळली आहे. येथे कामाख्या एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले. ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा विभागात ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही तर प्रवासी जखमी झाले नाहीत. रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताची पुष्टी केली आणि माहिती देताना सांगितले की, आज रविवारी सकाळी 11:54 वाजता ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा रोड विभागातील कटक-नारागुंडी रेल्वे विभागात ही घटना घडली.एसएमव्हीटी बेंगळुरू-कामाख्या एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस (12551) बेंगळुरूहून गुवाहाटीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि मेडिकल रिलीफ ट्रेनही तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वेने प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक हेल्पलाइन क्रमांक – 8991124238 जारी केला आहे.


0 Comments