Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

खिद्रापूरमधील प्राथमिक शाळेची उर्दू विद्यामंदिर शाळेची गगन भरारी : राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीत द्वितीय क्रमांक तर राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड

खिद्रापूर/ गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क :

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, शिक्षणाधिकारी (माध्यमिक /प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालव अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५२ वी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी २०२४-२०२५ दिनांक : २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५ आयोजित केले होते. यामध्ये उर्दू विद्यामंदिर खिद्रापूर (ता. शिरोळ जि. कोल्हापूर) शाळेचे उपकरण GAR-BAGE DISPOSAL MACHINE (कचरा वेचणाऱ्या यंत्राचे) सादरीकरण कु. अक्सा रियाज जमादार व कु. मिसबाह रमजान घुणके या विद्यार्थिनींनी मार्गदर्शक शिक्षक श्री. अमानुल्लाह सदरुद्दीन मुल्ला व श्री. नाजिम युसुफ जमादार मार्गदर्शनाखाली केले होते. ज्यामध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांक संपादन करून राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातून प्राथमिक गटात (इ. ६ वी ते ८ वी) १०६ उपकरणे मांडण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व उर्दू विद्या मंदिर खिद्रापूर या शाळेने करीत द्वितीय क्रमांक संपादन करून खिद्रापूर गावचे, शिरोळ तालुक्याचे व कोल्हापूर जिल्ह्याचे नावलौकिक केलेबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत असून राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कार्यतत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकएन, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, शिरोळचे गट विकास अधिकारी नारायण घोलप, गटशिक्षणाधिकारी सौ. भारती कोळी यांचे प्रोत्साहन लाभले. तर जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी मुसा सुतार, बीट शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, केंद्र प्रमुख रियाज अहमद चौगले यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामपंचायत खिद्रापूर, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...