Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

आदेश क्रांती मंडळाच्या युवकांमुळे टळला मोठा अनर्थ

कुरुंदवाड/गीता संघर्ष वृत्तसेवा। 

शिरढोण येथील नांदणी रस्त्यालगत असणाऱ्या शेतातील ऊसाच्या पाचोळ्याला आज दुपारी अचानक आग लागली.आगी लगतच किमान ५०-६० एकर उभे ऊस होते. अचानक आग लागल्यामुळे शेतकरी सैरावैरा आग विजवण्यासाठी धावु लागले.या घटनेचे गांभीर्य ओळखून आदेश-क्रांती मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली,त्यामुळे शेतकर्यांचे होणारे मोठे नुकसान टळले,तसेच यड्रावकर गटाचे कार्यकर्ते प्रविण दानोळे यांनी कुरुंदवाड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. वेळीच आग आटोक्यात आली नसती तर क्षेत्रातील सर्व ऊस जळून खाक झाले असते. सर्व शेतकऱ्यांनी यावेळी आदेश क्रांती मित्र मंडळाचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...