निपाणी / गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क :
निपाणी तालुक्यातील अक्कोळ परिसरात असलेल्या बाळोबा माळ येथे बुधवार (दि.04) रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मंगल सुकांत नाईक (वय 50) आणि प्रज्वल सुकांत नाईक (वय 18.रा.अक्कोळ) या आई- मुलाच्या खूनाची घटना घडली आहे. हा खून मुलीच्या नातेवाईकांनी प्रेमविवाहला विरोध केल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा त्या परिसरात दबक्या आवाजात चालू आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिस घटना स्थळी जाऊन पंचनामा करून या प्रकरणी हुक्केरी तालुक्यातील कोणकेरी गावच्या दोघां संशयीताना ताब्यात घेतल्याचे समजते. मयत मंगल नाईक यांच्या पतीचे निधन झाले असून त्या मुलगी आणि मुलगा प्रज्वल समवेत अक्कोळ येथे बाळोबा माळ परिसरात रहात होत्या.मंगल नाईक यांच्या मुलीला एकाने लग्नाची मागणी घातली होती. पण मुलीच्या घरच्या मंडळींनी याला विरोध दर्शविला होता.



0 Comments