Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

कौटुंबिक वादातून सासऱ्याच्या डोक्यात घातला दगड

इचलकरंजी/गीता संघर्ष वृत्तसेवा।

इचलकरंजी शहरातल्या आझाद गल्ली तीन बत्ती चौक आयजीएम रोड जवळ राहणाऱ्या जावयाने सासऱ्याच्या डोक्यात दगड घालून निघृण खून केला आहे. जावेद बाबु लाटकर असे मृत व्यक्तीचे नाव असून आरोपी सिकंदर शेख हा फरार झालाय, ही घटना बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आझाद गल्लीमध्ये सिकंदरच्या गाडीची दगड घालून मोठी तोडफोड करण्यात आली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी आणि मित्रपरिवारांना मोठी गर्दी केली होती. याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की इचलकरंजी शहरातील आझाद गल्लीत जावेद लाटकर हा आपल्या परिवारासह राहत होता. त्याच्या मुलीचा सिकंदर शेख याच्याशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. जावेद लाटकर आणि सिकंदर शेख यांच्यात काही वर्षांपासून वाद होतात या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून सासरा आणि जावयामध्ये जोरदार वादावादी सुरू होत. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जावेद लाटकर आपल्या परिवारासह घरामध्ये जेवत असताना सिकंदर शेख घराबाहेर येऊन परिवाराला शिवीगाळ करत तुला सोडणार नाही अशी धमकी देत परिसरामध्ये कोयता घेऊन सिकंदर शेखने दहशद माजवली होती. यावेळी जावेद लाटकर घरातून बाहेर आला असता सिकंदर शेखने सासरा जावेद लाटकर यांचा डोक्यात दगड घातला यामध्ये जावेद गंभीर जखमी झाला तिथून जात असताना पाठीमागून पुन्हा सिकंदरनं डोक्यात दगड घातल्यामुळे जावेद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असता त्याला नातेवाईकांनी इंदिरा गांधी रुग्णालयात आणलं असता उपचार सुरू असताना जावेदचा मृत्यू झाला. दरम्यान हल्ल्यानंतर लाटकर यांच्या काही नातेवाईकांनी सिकंदरला पकडून मारहाण केली त्याच्या बुलेट गाडीवर दगड टाकून गाडीची तोडफोड केली. त्यावेळी सिकंदर शेख हा फरार झाला. रात्रीच्या सुमाराला सासऱ्याची जावयाने निघृण हत्या केल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पाहणी करून आरोपीला पकडण्यासाठी तीन पथक रवाना केली आहेत. सिकंदर शेख याच्यावर यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बंडगर माळ चौकामध्ये एका टेम्पो चालकाला तलवार घेऊन दहशत माजवत त्याला धमकी दिल्याचा असल्याचा गुन्हा दाखल आहे. रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...