Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

गणपतराव पाटील यांना मताधिक्य देवून शिरोळ मतदारसंघात परिवर्तन घडवा : शिक्षक नेते व आमदार कपिल पाटील यांचे आवाहन

मजरेवाडी/गीता संघर्ष वृत्तसेवा। 

    लोकशाही व संविधान वाचवायचे असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही. गणपतराव पाटील दादा हे निष्कलंक व स्वच्छ प्रतिमेचे आहेत. कोणत्याही पदावर नसताना त्यांनी सामान्य जनतेला बळ दिले आहे, शेती व सहकार क्षेत्रात क्रांती घडवली आहे. समाज, जातीधर्मात आग लावणाऱ्यापासून सावध राहण्याची गरज असून महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना प्रचंड मताधिक्य देवून शिरोळ मतदार संघात परिवर्तन घडवावे, असे आवाहन शिक्षक नेते व आमदार कपिल पाटील यांनी केले.

       मजरेवाडी (ता. शिरोळ ) येथे मविआचे उमेदवार गणपतराव पाटील दादा यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. मारुती कोकणे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 

    मजरेवाडीचे माजी सरपंच सुरेश गवंडी यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा देऊन विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. अमर बुबनाळे यांनी स्वागत केले. 


   उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी गावात झालेल्या पदयात्रा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


          आमदार पाटील म्हणाले, गणपतराव पाटील यांनी पक्ष आणि तत्वनिष्ठा कधीही सोडली नाही. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता खाण्याची प्रवृती वाढली आहे. विरोधी उमेदवाराकडे पक्ष अथवा तत्वनिष्ठा सुद्धा नाही. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी गणपतराव पाटील यांच्या रूपाने चांगला उमेदवार मिळाला असून महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

       उमेदवार गणपतराव पाटील म्हणाले,  काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली तर मी लढणार आणि नाही मिळाली तर आघाडी धर्म पाळणार अशी प्रांजळ भूमिका मांडली होती. त्याप्रमाणे मी शब्दाला पक्का राहिलो आहे. पिताश्री स्व. सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर १४ सहकारी संस्था स्थिर स्थावर करून सामाजिक कार्याबरोबर राजकारणात काम सुरू केले. यापूर्वीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ज्यांना मी पाठिंबा दिला ते आज माझ्यासोबत राहिले नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल. प्रामाणिक सामाजिक कार्य करून पूरग्रस्त नागरिकांसाठी व शेती सुधारण्यासाठी काम केले. सामान्य जनतेला बळ दिले.  शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी अशी अपेक्षा आहे असे सांगून गणपतराव पाटील म्हणाले, जनतेच्या आरोग्यासाठी गो-परिक्रमा काढून आरोग्य सुधारण्याचा संदेश दिला. सकस आहारासाठी देशी बियाणे बँक निर्मिती केली आहे. केवळ रस्ते, गटर्स काम म्हणजे विकास होत नाही. शासनाच्या निधी व्यतिरिक्त सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी वेळ द्यावा लागतो. आमदार झाल्यानंतर स्वतःपेक्षा समाज हिताला प्राधान्य देणार आहे. जनतेनेही मला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

    यावेळी बाजीराव मालूसरे, अण्णासाहेब नरुटे, किशोर जुगळे, बाबासाहेब नदाफ, सुरेश गवंडी, सुनील चौगुले, चंद्रकला पाटील यांची भाषणे झाली.

   यावेळी बापूसो खरडे (गुरुजी ), मारुती कोकणे, शंकर कागले, बापूसो दतवाडे, धर्मेंद्र दत्तवाडे, वसंत नरुटे, जितेंद्र पट्टणकुडे, आनंदा पिंपळे, सुभाष बंडगर, किशोर जुगळे, संजय चव्हाण, सुरेश गवंडी, आप्पासो नरूटे, अजित कागले, राजू पिंपळे, श्रीपाल नरुटे, बुद्धीराज पाटील, शांतिनाथ दत्तवाडे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...