Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

ठेकेदाराचे दुर्लक्ष: अपघातास निमंत्रण

 हेरवाड / गीता संघर्ष वृत्तसेवा। 


 हेरवाड-अब्दुललाट मार्गावरील हेरवाड हद्दीत गैबन कंट्रक्शन कंपनीकडून सुरू असलेल्या गटारीच्या कामात ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. गटारीतील कचरा रस्त्यावर टाकल्याने १० ते १५ मोटरसायकलस्वार घसरले, त्यात ६ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात रस्त्यावर टाकलेल्या गटारीच्या कचऱ्यामुळे मोटरसायकलस्वारांचे नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर पडले. अपघातामुळे अनेकांना दुखापत झाली असून, काहींना स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

गैबान कंट्रक्शनकडून सुरू असलेल्या गटारीच्या कामात ठेकेदाराने गटारीतून काढलेला सर्व कचरा रस्त्यावर टाकला होता. यामुळे रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली. या दुर्लक्षामुळे मोटरसायकलस्वारांना नाहक अपघाताचा सामना करावा लागला. यामुळे संतप्त नागरिक आणि वाहनचालकांनी ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी केली आहे.

या अपघातामुळे वाहनचालक आणि स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात लक्ष घालून ठेकेदाराला जबाबदार धरून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

या घटनेमुळे रस्त्याच्या कामातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना अपघातांचा धोका निर्माण झाला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...