शालेय गणवेश शिलाईचे बिल काढण्यासाठी ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वय अधिकारी सचिन सिताराम कांबळे व सहाय्यक नियंत्रक उमेश बाळकृष्ण लिंगनूरकर या दोघांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक श्रीमती वैष्णवी सुरेश पाटील, पोलीस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पो.हे.कॉ विकास माने, मंदिप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील यांच्या पथकाने केली.
तक्रारदार यांची कोल्हापूर येथे कपडे तयार करण्याचे गारमेंन्ट असुन ते जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांचे शालेय गणवेश तयार करुन देण्याचे काम करतात महिला आर्थीक विकास महामंडळ, कोल्हापूर यांचेकडून करवीर तालुक्यातील जिल्हा १९ केंद्र शाळांना गणवेश पुरवठा करण्याचे काम, स्वयंसहाय्यता महिला समुहास घेतले होते.
शालेय गणवेश तयार करण्याचे एकुण बिल १८ लाख ३५ हजार ८१४ रुपये इतके झाले होते. त्यापैकी महिला आर्थीक विकास मंडळाने १४ लाख ३५ हजार रुपये बिल स्वयंसहाय्यता महिला समुह यांचे बैंक खात्यामध्ये वेळोवेळी जमा केले आहे.
उर्वरित बिलाबाबत उमेश लिंगपुरकर यांची भेट घेवून विचारले असता त्यांनी तुमचे यापूर्वी बिल मंजूर केले म्हणून तसेच शिल्लक राहीलेले बिल मंजुर करण्याकरिता मला व सचिन कांबळे साहेब यांना ८० हजार रुपये द्यावे लागतील तरच बिल मंजूर करू असे सांगून लाचेची मागणी केली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सचिन सिताराम कांबळे व उमेश बाळकृष्ण लिंगनूरकर या दोघांना रंगेहात पकडले संशयित आरोपी विरूध्द लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त / पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, पुणे, विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, पुणे यांचे मार्गदर्शनानुसार वैष्णवी पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. कोल्हापूर, आसमा मुल्ला, पोलीस निरीक्षक, प्रकाश भंडारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक विकास माने, पो.हे.कॉ संदिप काशीद, पो.ना. सचिन पाटील, पो.कॉ. कृष्णा पाटील अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे



0 Comments