Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

यांनी केला तर समझोता... इतरांनी केले तर गद्दारी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक नेत्यांनी बरीच खलबत केली. दरम्यान, काही नेत्यांनी उमेदवारीसाठी आपला मतदार संघ आपणास मिळावा यासाठी पक्षांतर केले आणि तिकीट मिळविले.  विरोधी युतीमध्ये किंवा त्याच युतीमधील मित्रपक्षामध्ये नेत्यांनी पक्षांतर करुन उमेदवारी मिळवली आहे.


भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनीही उमेदवारीसाठी अजित पवार गटात प्रवेश केला. तासगाव कवळमहांकाळ विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये अजित पवार गटाकडे आले. संजयकाका पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढायला इच्छूक होते. त्यामुळे त्यांनी भाजपमधून अजित पवार गटात प्रवेश केला.

भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.


भाजपचे नेते निशिकांत पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना अजित पवारांनी तिकीट दिलं आहे.

प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. प्रताप पाटील यांचा मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेल्यामुळे त्यांनी भाजपमधून अजित पवार गटात प्रवेश केला.

बुलढाणा मतदारसंघातून ठाकरे गटाने काँग्रेस नेत्या जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस पक्षामध्ये होत्या. काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. 

पूर्वी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांचे तिकीट महाविकास आघाडीने नाकारले. म्हणून त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवली.

राणे कुटुंबातील महत्त्वपूर्ण नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये असलेल्या राणे यांनी कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी शिंदे गटामध्ये प्रवेश केला.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...