Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा

 मुंबई / गीता संघर्ष वृत्तसेवा  :


भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहरातील १७८-धारावी१७९-सायन-कोळीवाडा१८०-वडाळा१८१-माहिम आणि १८२-वरळी या पाच विधानसभा मतदारसंघांची केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आज भेट देऊन स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाचा आढावा घेतला.

निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठीमुंबई शहर जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली १० विधानसभा मतदारसंघात स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (SST) नियुक्त करण्यात आल्या आहेत. या टीमच्या कामकाजावर खर्च निरीक्षक लक्ष ठेवत आहेत.

माहीम विधानसभा मतदारसंघातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाबद्दल माहिती घेतल्यानंतर श्री. वसंता यांनी वाहन तपासणीसाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने रोख रक्कममद्यसाठाभेटवस्तू आणि शस्त्रसाठा तपासण्याची आवश्यकता व्यक्त केली. सर्व तपासणीचे छायाचित्रण करण्याबाबत योग्य दक्षता घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक टीमने त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल संबंधितांना वेळेत पाठवावाअसे निर्देशही त्यांनी दिले.

विधानसभा निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यातयासाठी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने २४ तास तीन शिफ्टमध्ये काम करण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी त्यांचे संपर्क अधिकारी संदिपान मते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...