खिद्रापूर/ गीता संघर्ष वृत्तसेवा। 'प्रधान मंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजने'च्या सर्वेक्षणाचे काम भारतीय डाक विभागातील सर्व पोस्टमनना देण्यात आले आहे. यासाठी पोस्टमन आपल्या घरी येवून सर्वेक्षण करणार आहेत. याकामी सर्व नागरिकांनी डाक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी 12 मार्च रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले होते.
या योजनेद्वारे 1 कोटी घरांना मोफत योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेत 300 युनिटपर्यंत मोफत वीज देऊन 1 कोटी घरांना प्रकाश देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. "सौर पॅनलच्या किंमतीसाठी जनतेवर कोणताही बोजा पडणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. यामध्ये लोकांना जास्तीत जास्त अनुदान दिले जाणार असून तळागाळात योजना लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकार क्षेत्रात छतावरील सौर पॅनलला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार असून या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळणार आहे. तसेच वीज बिल कमी होवून रोजगार निर्मितीही होणार आहे, असेही श्री. इंगळे यांनी पत्रकाव्दारे कळविले होते. पण खिद्रापूर येथील पोस्टमन एकाही घरी सर्व्हेक्षणासाठी गेले नाहीत. कोणत्याही योजनेची माहिती नागरिकांना देणेत येत नाही. त्यामुळे खिद्रापूर येथील पोस्ट ऑफिस असून नसल्यासारखेच आहे. डाक विभाग आपल्या कार्याचा मोठेपणा सांगतो. पण कर्मचाऱ्यांचे मात्र कामाच्या नावाने ठणाणा !
.jpeg)


0 Comments