जयसिंगपूर/गीता संघर्ष वृत्तसेवा।
चारित्र्याच्या संशयावरून यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने मारून पत्नीसह सासू, मेव्हणा, मेव्हणीचा खून केल्याप्रकरणी कवठेगुलंद इथल्या प्रदीप विश्वनाथ जगताप (वय ४०) याला जयसिंगपूर इथल्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलीय. ही घटना यड्राव इथं ऑक्टोबर २०१८ साली घडली होती. यड्राव मधील पार्वती औद्योगिक वसाहत इथं आरोपी प्रदीप जगताप यानं पत्नी रूपाली हिच्याबरोबर चारित्र्याचा संशयावरून भांडण काढलं होतं. यावेळी यंत्रमागाच्या लाकडी माऱ्यानं सासू छाया श्रीपती आयरेकर, पत्नी रूपाली, मेव्हणी सोनाली रावण, मेव्हणा रोहित आयरेकर यांना डोकीत मारून ठार केलं होत. याप्रकरणी शहापूर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. आरोपीची मुलगी हिच्यासह २४ जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी मंगळवारी हा निकाल दिला.



0 Comments