Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

शरद पवार 'तुतारी'चे : कुरुंदवाडमध्ये स्वागत

 कुरुंदवाड / गीता संघर्ष वृत्तसेवा। 

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचा "तुतारी वाजवणारा माणूस" या चिन्हाचा रायगड येथे झालेल्या लोकार्पण सोहळ्याचा कुरुंदवाड येथे साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तुतारी घेतलेल्या माणसाला पुष्पहार घालून पेढा भरवून सत्कार करण्यात आला.

      येथील पालिका चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या शिरोळ तालुका व कुरुंदवाड शहर पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या चिन्हाचे लोकार्पण झाल्याचा आनंद साजरा करत.शरद पवारांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडले.

      यावेळी शरद पवार गटाचे शिरोळ तालुका विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बबलू पवार म्हणाले गेली पाच ते सहा दशके महाराष्ट्र राज्यातील राजकारणातील जाणता राजा म्हणून शरदचंद्र पवार यांच्याकडे पाहिले जाते. पक्षातील काहींनी गद्दारी करून पक्ष आणि चिन्ह काढून घेतले असले तरी नव्या दिमतीने पुन्हा नवा पक्ष आणि नवा चिन्ह घेऊन जनतेपुढे जात आहे."तुतारी वाजवणारा माणूस"ही एक नव्या राजकारणाची ललकारी पवार साहेबांनी दिली असून जनतेने याचे स्वागत केले आहे.

      शहराध्यक्ष तानाजी आलासे,रमेश भुजुगडे,रामचंद्र मोहिते आदींनी मनोगते व्यक्त केली.चौकात साखर-पेढे वाटून आनंद साजरा केला.यावेळी आर.आर पाटील,सिकंदर सारवान,अनिल चव्हाण,असिफ घोरी,आण्णाप्पा आवळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...