कोल्हापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा।
तीन पट रक्कम देण्याचे अमिष दाखवून बनावट नोटा गळ्यात घालून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला . याप्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून नोटा छापणारे मशीन , कोरे कागद, काचेच्या पट्ट्या, चिकट टेप असा १ लाख५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे रविवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.
बेलवळे (तालुका कागल) येथे रविवारी रात्री छापा टाकून मेहरुम अल्ताफ सरकवास( वय 41 राहणार बेळगाव), सलील रफिक सय्यद( वय ३०राहणार गोकाक, जिल्हा बेळगाव) अशी ( अटक केलेल्यांची नावे आहेत.
अशोक पाटील नावाचा इसम कर्जबाजारी लोकांना पैसे पुरवतो, अडचणीत सापडलेले लोकांना मदत करतो, अशी माहिती समजली होती.त्यानुसार एक व्यक्ती त्यांच्याकडे तीन पट पैसे मागण्यासाठी गेला, या व्यक्तीला एक लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. एक लाख रुपयाच्या बदल्यात तीन लाख रुपये देण्याचे अमिष दाखवले होते.
याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना समजली होती. त्यांनी स. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक या ठिकाणी पाठवून दिले. या पथकाने रविवारी रात्री तिघांना ताब्यात घेतले तसेच या ठिकाणाहून बनावट नोटा छापणारे मशीन, कोरे कागद, चिकट टेप ,लिक्विड असणाऱ्या बरण्या नोटांच्या आकारांचे लहान कागद असा एक लाख 53 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त केला.
कर्ज मागण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला बनावट पोलिसांचा या ठिकाणी छापा पडला आहे, असे भासवून त्याचे लाखो रुपये हडप केले जात होते .अशी माहिती ही समोर आली आहे पोलीस याची खात्री करत आहेत.



0 Comments