Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

”केस परत घे नाहीतर…”; दलित महिलेची नराधमांनी केली निर्घृण हत्या

राष्ट्रीय/वृत्तसंस्था।  


गुजरातमधील भावनगरमधून एका दलित महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. इथे चार जणांनी मिळून दलित महिलेला मारहाण करुन तिची हत्या केली. असे सांगण्यात येत आहे की, महिलेने 3 वर्षांपूर्वी आपल्या मुलावरील अत्याचाराचा खटला मागे घेण्यास नकार दिला होता, यासाठी आरोपींनी आधी तिला मारहाण केली आणि नंतर तिची हत्या केली. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गीताबेन मारु असे महिलेचे नाव असून शैलेश कोळी, त्याचा मित्र रोहल कोळी आणि त्यांचे दोन अनोळखी सहकारी अशी आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलिस उपअधीक्षक आर.आर.सिंघल यांनी सांगितले की, रविवारी रात्री गीताबेन मारु यांनी खुनापूर्वी चार आरोपींविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. शैलेश कोळी, त्याचा मित्र रोहल कोळी आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांनी (woman) तिच्यावर स्टीलच्या पाईपने हल्ला केल्याचे गीताबेन मारु यांनी फिर्यादीत म्हटले आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या गीताबेन मारु यांचा सोमवारी सर तख्तसिंहजी जनरल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध खून, प्राणघातक हल्ला आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, ‘मारुच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंबीय आणि स्थानिक दलित नेत्यांनी भावनगरमधील रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. जोपर्यंत चार आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मारुच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. एफआयआरनुसार, मारुला अनेक फ्रॅक्चर आणि जखमा झाल्या आहेत. याशिवाय आरोपींनी मारुच्या पती आणि मुलीलाही धमकावले, त्यामुळे त्यांना पळून जावे लागले.’

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...