झांशी/ वृत्तसंस्था।
उत्तर प्रदेशात संपर्क क्रांती ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या निवृत्त शास्त्रज्ञ जोडपे, जोडप्यावर एका व्यक्तीने लघवी केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रवासादरम्यान मद्य प्राशन करण्यावरून या जोडप्याचा आरोपीसोबत वाद झाल्यानंतर ही घटना घडली.
निवृत्त शास्त्रज्ञ जोडपे, मूळचे मध्य प्रदेशचे असून, ट्रेनच्या एसी-३ डब्यातून प्रवास करत होते. आरोपानुसार, प्रवासादरम्यान डब्यातून प्रवास करणाऱ्या अन्य रितेश नावाच्या एका प्रवाशाने मद्यप्राशन केले होते. त्यामुळे माणूस आणि त्या जोडप्यामध्ये बाचाबाची झाली. वादात रितेशने दाम्पत्याच्या बर्थवर लघवी केल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या जोडप्याने तातडीने ही बाब रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितली. तक्रार मिळाल्यानंतर रेल्वे संरक्षण दल (RPF) झाशी स्थानकावर दाखल झाले. त्यांनी तातडीने त्या व्यक्तीला ट्रेनमधून बाहेर काढले आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली.
ट्रेनच्या तिकीट परीक्षकाने (टीटीई) दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.



0 Comments