Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

मराठा समाजाच्या वतीने दत्तवाड येथे लाठीहल्ल्याचा निषेध

 दत्तवाड/गीता संघर्ष वृत्तसेवा। 


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षण मागणीसाठी  जमलेल्याआंदोलकांवर पोलीसांनी  लाठीहल्ला केला यांच्या निषेधार्थ दतवाड  ता शिरोळ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गावांतून निषेध फेरी काढण्यात आली. ग्रामसेवक संतोष चव्हाण गाव कामगार तलाठी मुजावर यांना निवेदन देऊन शासनाचा निषेध करण्यात आला.

     छत्रपती शिवाजी चौकात मराठा समाजाचे कार्यकर्ते एकत्र येऊन येथून निषेध फेरीला सुरवात झाली छत्रपती शिवाजी चौक, दवाखाना कोपरा, मुख्य पेठलाईन अशी फेरी काढण्यात आली.एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत फेरी काढून गांधी चौकात आल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने तलाठी व ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले .

 यावेळी  तानाजी मोहिते,बाळ दळवी, ग्रामपंचायत सदस्य बाबूराव पोवार गणपतराव जाधव युवराज घोरपडे बाळ काटकर प्रताप मोहिते  राजू पलसकर निलेश मोहीते बबनराव मोटे यांच्या सह युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 शेवटी आभार दिलीप साळुंखे यांनी मानले

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...