Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

आघाडीच्या इंडिया नावावरून वाद : भारत माता की जय - अभिताभ यांचं ट्विट

 मुंबई/गीता संघर्ष वृत्तसेवा |

भाजपविरोधात असणाऱ्या विरोधकांनी आपल्या आघाडीला इंडिया असं नाव दिल्याने सध्या एकच चर्चा आणि वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

अशातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे व्हायरल झालेल्या एका पत्रावर 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया'ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख असल्याने वादात आणखी भर पडली. दरम्यान, इंडिया आघाडीच्या नावावरून सुरू असलेल्या वादादरम्यान, बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी भारत माता की जय असं म्हटले आहे. 'भारत माता की जय'! त्याचसोबत अमिताभ बच्चन यांनी भारताचा तिरंगा आणि लाल झेंड्याचा साईनही पोस्ट केले. त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्स येत असून आपले मत नेटकरी व्यक्त करताना दिसत आहेत. 


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...