Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

शेतकऱ्यांचे पैसे थकविले : साखर कारखान्याच्या साहित्य जप्तीचे आदेश

 दौंड/गीता संघर्ष वृत्तसेवा।    

 भीमा पाटस साखर कारखान्याला शेतकऱ्यांचे 5कोटी 78 लाख रुपये थकवल्याच्या तक्रारीवरून दिलेल्या नोटीस नंतर देखील पैसे न दिल्यावरून साखर आयुक्तांनी यासंदर्भात कडक कारवाई करत भीमा पाटस साखर कारखान्यातील असलेल्या साहित्याच्या जप्तीचे आदेश दिलेले आहेत.

दौंडचे आमदार व भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांना मोठा धक्का आहे. या साखर कारखान्यात शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस आणला होता. मात्र त्याचे पैसे मिळाले नाही म्हणून शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे आमचे पैसे थकवल्याची तक्रार दिली होती. त्यासाठी साखर आयुक्तांनी भीमा पाटस साखर कारखान्याला नोटीस पाठविली होती. मात्र अद्याप कारखान्याकडून कोणतीही कारवाई न केल्यामुळे आता साखर आयुक्तांनी कडक कारवाई करत कारखान्यातील साहित्यांची जप्ती करण्याचे आदेश दिले आहे. या साहित्याने शेतकऱ्यांचे पैसे करत केले जाणार आहे. या कारवाईमुळे भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...