Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

हेरवाड येथे जागतिक स्तनपान सप्ताह

 हेरवाड/गीता संघर्ष वृत्तसेवा। 


येथे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला.सरपंच रेखा जाधव,पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाज जमादार,ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या विजयमाला पाटील,छाया सूर्यवंशी,विद्या माने,शितल कांबळे,हेरवाडच्या समुदाय आरोग्याधिकारी डॉ.वंदना गिरमल उपस्थित होत्या.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका चावरे यांनी केले. उपस्थितांना मार्गदर्शन समुदाय आरोग्याधिकारी डॉ.वंदना गिरमल यांनी केले. सरपंच मॅडम यांनी अंगणवाडीसाठी जी काही मदत लागेल. ते सर्व आमच्याकडून त्यांना मिळेल. तसेच गाव कुपोषणमुक्त करण्यासाठी जे काही करायचे असेल ते सर्व करू.असे त्यांनी सांगितले. माजी सभापती मिनाज जमादार यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. 

       या कार्यक्रमासाठी आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

आजच्या कार्यक्रमात नवनियुक्त तिन्ही मदतनीसांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.आभार अकिवाटे मॅडमांनी मानले. सूत्रसंचलन सुजाता गुरव यांनी केले.कार्यक्रमास बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता गुजर यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...