Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अदियाला तुरुंगात रवानगी

स्लामाबाद (वृत्तसंस्था)-

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना काल इस्लामाबादेतील अटक येथील तुरुंगात ठेवण्यात आले. मात्र आता त्यांना रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. इम्रान खान यांना तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायालयानेच याबाबतचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने इस्लामाबाद पोलिसांना इम्रान खान यांच्या अटकेचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्ष्यात त्यांना पंजाब पोलिसांनी अटक केली होती. इम्रान खान यांना अदियाला तुरुंगात ठेवले जावे, असे स्पष्ट निर्देश अदियाला तुरुंग अधिक्षकांना दिले असतानाही इम्रान यांना कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये अटक येथील तुरुंगात हलवण्यात आले होते.

अटक आणि तुरुंगाबाबतचे न्यायालयाचे दोन्ही आदेश पाळण्यात आले नाहीत. एवढेच नव्ह तर तुरुंगात नेण्यापूर्वी इम्रान खान यांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे होते. ती देखील केली गेली नाही, असे पाकिस्तानातील माध्यमांनी म्हटले आहे.

इम्रान यांना अटकच्या तुरुंगात ठेवले गेले, यामागचे एक कारण सांगितले जाते आहे. माजी लष्करी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी देखील माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सत्तेवरून खाली खेचल्यावर याच तुरुंगात ठेवले होते.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...