पत्रकार नामदेव निर्मळे यांजकडून
टाकळी/गीता संघर्ष वृत्तसेवा।
टाकळीवाडी ता. शिरोळ येथे सैनिक असोसिएशनच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय जवळ समस्त गावकऱ्यांच्यावतीने भारतीय सेनेबद्दल आदर व्यक्त केला. भारतीय सेना कुठे कमी नाही.
कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अमर जवान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
राजू जुगळे सर यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गावातील सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, समस्त गावकरी, आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments