हेरवाड / गीता संघर्ष वृत्तसेवा :
| अफसर मकानदार-ग्रामपंचायत सदस्य, हेरवाड |
शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून झालेल्या शिवशैल हॉल ते श्री संतुबाई मंदिरापर्यंतच्या रस्ता कामाचा बोर्ड हा वादळी वार्याने पडला असल्याने तो बोर्ड लवकरच लावणार असल्याने काहींनी जावई शोध लावून हा बोर्ड इतरत्र लावला असल्याचा गजबजा करीत आहेत. त्यामुळे टीका करताना त्याची वस्तुस्थिती पहावी मग टीका करावी, असा सल्ला ग्रामपंचायत सदस्य अफसर मकानदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वी या रस्त्याचे काम झाले असून याबाबतचा बोर्ड संबंधित ठेकेदाराने लावला होता, मात्र परवा झालेल्या वादळी वार्यामुळे हा बोर्ड कोसळला होता, त्यामुळे शेजारी असणार्या गोठ्यामध्ये तात्पुरता हा बोर्ड ठेवण्यात आला आहे. लवकरच हा बोर्ड लावणार आहे. मात्र, काहींनी याची वस्तूस्थिती न पाहता हा बोर्ड कलर करुन इतरत्र लावला असल्याचा जावई शोध लावला आहे. शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून हेरवाड गावात विविध विकासकामे होत आहेत, त्यामुळे हेरवाडच्या लौकीकात भर पडत आहे, मात्र, किरकोळ गोष्टीवरुन काहीजण व्देष पसरवित आहेत, जनता ही जाणती आहे, हे खोटा दावा करणार्यांनी समजून घ्यावे, असे आवाहनही मकानदार यांनी यावेळी बोलताना केले.


0 Comments