Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

विज्ञान प्रदर्शनात उर्दू खिद्रापूर तालुक्यात तृतीय, जिल्ह्यासाठी निवड

 शिरोळ / गीता संघर्ष वृत्तसेवा :


 शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ व रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  सुवर्ण महोत्सवी शिरोळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर येथे दिनांक 19 ते 21 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले होते. यामध्ये उर्दू विद्या मंदिर खिद्रापूर शाळेच्या विद्यार्थीनी आफीरा अब्बास घुनके व आरीफा हमीद जमादार यांनी विषय शिक्षक आसिफ मुजावर यांच्या मार्गदर्शना खाली "वीज विरहित पाणी पंप" या उपकरणाचे सादरीकरण  करून,तालुक्यात तृतीय क्रमांक संपादन केले. या बद्दल हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत, उद्योगपती व संस्थेचे विश्वस्त  बाबुलाल मालू यांच्या हस्ते  सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख  यांना सन्मानित करण्यात आले.

यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नाजिम जमादार, शिक्षक, बुशेरा पटेल,अंजुमआरा बुखारी,  मोअज्जम चौगले, दिलीप शिरढोणे,केंद्रप्रमुख रियाज अहमद चौगले, उर्दू विस्तार अधिकारी  मुसा सुतार, विज्ञान विभागप्रमुख, विस्तार अधिकारी,पं स शिरोळ  अनिल ओमासे, गटशिक्षणाधिकारी पं स शिरोळ दिपक कामत यांचे मार्गदर्शन लाभले

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...