Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

घाटात मृतदेह टाकताना नेमके घडले काय?

 सातारा /गीता संघर्ष वृत्तसेवा। 


आंबोली घाटातील दरीत एकाचा मृतदेह टाकण्यासाठी आलेल्या कराड येथील एकाचा पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला आहे. दरीत पडून मृत्यू झालेल्या त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी तूर्तास ताब्यात घेतले आहे. संबंधिताची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सावंतवाडी पोलिसांनी आंबोली घाटाच्या दरीत उतरून दोन्ही मृतदेहांचा शोध सुरू केला आहे.या घटनेबाबत दरीत पडून मृत्यू झालेल्याच्या सहकाऱ्याने पोलिसांना आणि माध्यमांना दिलेली माहिती अशी की कराड येथील मित्राकडून एकाने वीटभट्टी व्यवसायासाठी एकाला दोन ते तीन लाख रुपये दिले होते. हे पैसे परत करत नसल्याने त्या व्यक्तीला गाडीत घालून मारहाण केली. यावेळी त्याचा हदयविकाराने मृत्यू झाला.

त्यामुळे आम्ही घाबरलो. त्याचा मृतदेह टाकण्यासाठी आंबोली घाटात आलो. काल (सोमवार) रात्री साधारणत: साडेसात- आठ वाजता घाटात आलो. त्याचा मृतदेह टाकताना माझ्या मित्राचा पाय घसरला आणि तो देखील मृतदेहासह दरीत पडला. भीती वाटल्याने मी गाडीत बसून राहिलो. या घटनेची माहिती मिळताच पोलीस येथे आले. सावंतवाडी पोलिस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...