Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

कोल्हापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा : 


 
 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षांच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने  https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर असून  अर्ज भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 16 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.

क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्या-या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, दिव्यांग राज्य क्रीडा पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाचे https://sports.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ पहावे किंवा दूरध्वनी 0231-2645208 वर संपर्क साधावा, असेही डॉ. साखरे यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...