शिरोळ/खिद्रापूर : गीता संघर्ष वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत केंद्रस्थान असलेली पंचायत समिती शिरोळ या ना त्या कारभाराने नेहमीच चर्चेत राहत आली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवत भ्रष्ट ग्रामसेवकांना अधिकाऱ्यांना पाठीशी घालून त्यामधील आपला सहभाग शिरोळ पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी उघडपणे दाखवत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. खिद्रापूर येथील एका तक्रारदाराने खिद्रापूर मध्ये सुरू असलेल्या कामकाजाविषयी लोकशाही दिनामध्ये 28 ऑक्टोबर 2021 रोजी कोल्हापूर येथे अर्ज केला असता सदरचा अर्ज कार्यवाहीसाठी शिरोळ पंचायत समिती येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या कडे दाखल झाला. पण ज्या अर्जाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावयाची आहे, असा अर्ज शिरोळ पंचायत समितीच्या वरिष्ठांनी ज्यांचेवर आरोप आहेत- ज्यांची चौकशी करावयाची आहे. त्यांच्याकडेच सदरचा अर्ज डिसेंबर 2021 मध्ये हस्तांतरित केला. सदरचा अर्ज ग्रामपंचायत खिद्रापूर येथे चौकशीसाठी दाखल झाल्यानंतर सदरच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही न करता दप्तरी डांबून ठेवण्यात आला.
याबाबत तक्रारदाराने वारंवार सदर ग्रामसेवकाकडे विचारणा केली असता सदरच्या अर्जामधील नमूद बाबी पाहता आरोप हा ग्रामपंचायतीवर आहे. ज्यांचे वर आरोप आहे त्यांनीच त्यांची चौकशी करून अहवाल कसा द्यायचा? मला चौकशीचे अधिकार नाहीत, असे म्हणून सदरच्या अर्जावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे ग्रामसेवक अप्पासाहेब मुल्ला यांनी तक्रारदार यांना सांगितले. तसेच ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांनी हेही सांगितले की संबंधित विषयाचे दप्तर तत्कालीन ग्रामसेवक महालिंग अकिवाटे यांनी माझे चार्जमध्ये दिलेले नाही. त्यामुळे सदर अर्जावर मला कोणतीही कार्यवाही करता येत नाही.
याबाबत अर्जदार यांनी गटविकास अधिकारी शंकर कवितके यांची भेट घेतली असता त्यांनी ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांना महालिंग अकिवाटे यांना सदरचे दप्तराबाबत विचारणा करणे विषयी नोटीस बजावण्यास सांगितले. पण नोटीस बजावणी करूनही कोणत्याही प्रकारचे उत्तर तात्काळ न दिल्याने ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांनी दुबार नोटीस बजावणी ग्रामसेवक अकिवाटे यांना केली.
तरीही सदर अर्जावर कार्यवाही होणे दिसून येत नसल्याचे पाहून तक्रारदार यांनी 16 जून 2022 रोजी ग्रामपंचायत खिद्रापूर समोर बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली. तरीही ग्रामसेवक अकिवाटे यांना पाठीशी घालत उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्याकडे दुर्लक्ष करीत कार्यवाही करण्याचे टाळले. शेवटी उपोषणकर्त्यास पाचव्या दिवशी लोकशाही दिनातील अर्जासंदर्भात तात्काळ चौकशी सुरुवात करण्याविषयी ग्रामसेवक अप्पासाहेब मुल्ला यांना सदरचा अर्ज पंचायत समिती शिरोळ कडे वर्ग करण्यास सांगितले.
तसेच ग्रामपंचायत खिद्रापूर मध्ये झालेले ठराव ग्रामपंचायती मध्ये संबंधित विषयाचे दप्तर नसतानाही कसे झाले? यासंदर्भात नोटीस काढून ग्रामसेवक महालिंग अकिवाटे यांच्याकडे खुलासा मागणी करीत असल्याचे सांगितले. पण आज महिना उलटत आला तरी शिरोळ पंचायत समितीकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. विचारणा केली असता ग्रामपंचायतीकडून अर्ज वर्गच झाला नसल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला यांना विचारले असता अर्ज ईमेल द्वारे वर्ग केल्याचे सांगतात. एकंदरीत सर्व प्रकार पाहता ग्रामसेवक अकिवाटे यांना वाचविण्यासाठी पंचायत समितीचे सर्व अधिकारी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत असून खिद्रापूर येथील घरकुल प्रकरणात सर्वच अधिकाऱ्यांचे हात ओले झाले आहेत काय? अशी चर्चा शिरोळ तालुक्यात रंगली आहे.

0 Comments