सांगली / गीता संघर्ष वृत्तसेवा
जिल्ह्यात पाऊस सुरु असतानाच पूर्व जत भागात आज सकाळी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. त्यामुळं जतच्या पूर्व भागात भीतीचं वातवरण पसरलंय. भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल असून अद्याप कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती समोर आलीय.
जत पूर्वभाग आणि कर्नाटक सीमावर्ती भागात आज सकाळी ६.२२ वाजताच्या सुमारास वीस ते तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले.माडग्याळ, सोन्याळ, करजगी, बेलोडगी, बोर्गी, गिरगाव, कोंतेवबोबलाद,
संख व मोरबगी आदी गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्र बिंदू विजयपूर जिल्ह्यात विजयपूर पासून पंधरा किलोमीटर असल्याचं सांगण्यात येतंय. सदरच्या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल असल्याचं समजतंय.







0 Comments