निपाणी / गीता संघर्ष वृत्तसेवा
पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावरील धोकादायक वळणावर भरदाव ट्रक पलटी झाल्याने दोघेजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास झाला.
अपघातग्रस्त ट्रक काजू बियाणेव कच्चामाल भरून कोल्हापूरच्या दिशेने जात होता वळणावर ट्रक आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.
त्यामुळे ट्रक रस्त्यातच पलटी झाला. दरम्यान या अपघातामुळे वेळगावहून कोल्हापूरकडे होणारी
वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान घटनास्थळी रस्ते देखभाल जयहिंद कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अमोल नाईक यांनी व कर्मचारी भेट दिली.







0 Comments